Papaya : पपई उत्पादनात गुजरात आहे आघाडीवर, जाणून घ्या महाराष्ट्र कोणत्या स्थानावर

Aslam Abdul Shanedivan

पपई

आपल्या आहारात फळांचा समावेश असेल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. तर चवीला गोड असलेली पपई देखील आरोग्यासाठी वरदान ठरते.

सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये

भारतात पपईचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते. आंध्र प्रदेश मागे सोडून गुजरात पपईच्या उत्पादनात पुढे गेला आहे. पपई उत्पादनात गुजरातचा २०.६९ टक्के वाटा आहे.

Papaya | Agrowon

गुजरातनंतर आंध्र प्रदेश

पपई पिकल्यानंतर किंवा कच्चेही वापरले जाते. गुजरातनंतर पपईच्या उत्पादनात आंध्र प्रदेशाचा नंबर लागतो. येथे १६.७२ टक्के पपईचे उत्पादन घेतले जाते.

Papaya | Agrowon

मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर

पपईमध्ये पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते खायला अनेकांना आवडते. पपई उत्पादनात मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे उत्पादन ९.९२ टक्के आहे.

Papaya | Agrowon

महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

अनेक रोगांवर फायदेशीर असणारे व्हिटॅमिन ए पपईमध्ये सापडते. तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यात ९.३९ टक्के पपईचे उत्पादन घेतले जाते.

Papaya | Agrowon

कर्नाटक पाचव्या क्रमांकावर

अपचनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी पपई हा रामबाण उपाय मानला जातो. पपई उत्पादनात कर्नाटक पाचव्या क्रमांकावर असून पपईचे ८.५२ टक्के उत्पादन येथे होते.

Papaya | Agrowon

सहाव्या स्थानावर छत्तीसगड

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगड पपईच्या उत्पादनात सहाव्या स्थानावर असून येथे ६.९० टक्के पपईचे उत्पादन घेतले जाते.

Papaya | Agrowon

Kolhapur Monsoon Tourism : पावसाळ्यात आनंद लूटा कोल्हापूरच्या 'या' ठिकाणांवर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.