National Girl Child Day 2024 : राष्ट्रीय बालिका दिनाच्या औचित्यावर करा मुलीचे भविष्य सुरक्षित

Aslam Abdul Shanedivan

राष्ट्रीय बालिका दिन

आज राष्ट्रीय बालिका दिन असून हा दिवस मुलींना समर्पित आहे. आजच्या दिवसाचे औचित्यसाधून तुम्हाला तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असल्यास या योजना महत्वाच्या ठरू शकतात.

National Girl Child Day 2024 | agrowon

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वर्षाला १.५ लाख जमा करता येतात. याची किमान मर्यादा २५० आहे. तर याचा परतावा मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मिळतो.

National Girl Child Day 2024 | agrowon

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) तुमच्या मुलीला आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य देखील देऊ शकते. यामध्ये किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेची मुदत १५ वर्षे असून सध्या ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.

National Girl Child Day 2024 | agrowon

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (PORD)

ही देखील एक छोटी बचत योजना आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला १०० रुपये गुंतवून सुरुवात करता येते. सध्या, ५ वर्षांसाठी ५.८ व्याज मिळतो.

National Girl Child Day 2024 | agrowon

चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड

तुमच्या मुलीसाठी सर्वोत्तम भेट ठरू शकते. यामध्ये १८ वर्षांचा लॉकिंग कालावधी असतो. तर व्याज देखील सरकारी योजनांपेक्षा जास्त आहे. यात हायब्रिड इक्विटी आणि हायब्रिड डेट फंड असतो.

National Girl Child Day 2024 | agrowon

गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ

यामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्य सुरक्षित होऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून सोन्याचा सरासरी परतावा १० टक्के इतका आहे. त्यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा निधी जमा होईल.

National Girl Child Day 2024 | agrowon

जीवन विमा

जीवन विमा तुमच्या मुलीला दुहेरी सुरक्षा देखील देऊ शकते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. याशिवाय पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर त्याला मोठा निधी मिळेल.

National Girl Child Day 2024 | agrowon

Bachchu Kadu : बैलगाडा शर्यतीचा भिडू बच्चू भाऊ कडू, अवघ्या ८ सेकंदात पार केलं मैदान...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी वाचा