Cotton Bollworm Control: कपाशीला बोंडअळीपासून वाचवा! कमी खर्चातील ८ उपाय

Swarali Pawar

कपाशी वाचवायची?

कमी पावसात वाचवलेली कपाशी आता बोंडअळीमुळे हातची जाऊ नये, यासाठी नियमित पाहणी करा. वेळीच प्रादुर्भाव ओळखून कमी खर्चातील उपाय केल्यास नुकसान टाळता येते.

Cotton Crop Protection | Agrowon

बोंडअळीचे ३ प्रकार

कपाशीवर गुलाबी, हिरवी आणि ठिपक्यांची बोंडअळी आढळू शकते. यापैकी गुलाबी बोंडअळी बोंडात शिरल्यानंतर तिचे नियंत्रण कठीण होते.

Cotton Crop Protection | Agrowon

प्रादुर्भाव कधी गंभीर?

२० हिरव्या बोंडांपैकी २ बोंडे बाधित किंवा छिद्रयुक्त दिसली तर आर्थिक नुकसान पातळी गाठली असे मानावे. कामगंध सापळ्यात सलग ३ दिवस सरासरी ५ ते ८ पतंग आढळले तरी नियंत्रण करा.

Cotton Crop Protection | Agrowon

डोमकळ्या तोडून नष्ट करा!

गुलाबी बोंडअळीची लक्षणे असलेल्या डोमकळ्या तोडून नष्ट करा. त्या जाळा किंवा जमिनीत खोल पुरा आणि शेतात नियमित पाहणी सुरू ठेवा.

Cotton Crop Protection | Agrowon

कामगंध सापळे लावा

गुलाबी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा १ ते १.५ फूट उंचीवर लावा. प्रादुर्भाव जास्त असल्यास पतंग पकडण्यासाठी सापळ्यांची संख्या वाढवता येते.

Cotton Crop Protection | Agrowon

पक्षीथांबे आणि जैविक उपाय

कपाशीमध्ये हेक्टरी किमान २५ पक्षीथांबे उभारल्यास कीटकभक्षी पक्ष्यांना अळ्या खाण्यास मदत होते. ५ टक्के निंबोळी अर्क, अझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम किंवा बिव्हेरिया बॅसियाना यांसारखे कमी खर्चातील पर्याय वापरता येतात.

Cotton Crop Protection | Agrowon

प्रादुर्भाव वाढला तर फवारणी

प्रादुर्भाव वाढल्यास शिफारशीनुसार प्रोफेनोफॉस, इमामेक्टिन बेन्झोएट, इंडोक्साकार्ब, क्लोरपायरिफॉस किंवा फिप्रोनिल यापैकी योग्य कीटकनाशक वापरा. एकाच कीटकनाशकाची दोनपेक्षा जास्त वेळा फवारणी करू नका आणि अद्ययावत लेबलवरील पिकनिहाय शिफारस तपासा.

Cotton Crop Protection | Agrowon

नियमित निरीक्षण!

आठवड्यातून नियमित पाहणी करून बोंडे, डोमकळ्या आणि कामगंध सापळ्यांतील पतंग तपासा. प्रादुर्भाव सुरुवातीलाच ओळखल्यास कमी खर्चात कपाशीचे नुकसान रोखता येते.

Cotton Crop Protection | Agrowon

Oat Fodder: रब्बीत ओटची लागवड! अडीच महिन्यांत मिळेल पौष्टिक हिरवा चारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..