Swarali Pawar
ओट हे थंड हवामानात जोमाने वाढणारे पौष्टिक चारा पीक आहे. हिरवा चारा, वाळलेला चारा आणि मुरघासासाठीही त्याचा वापर करता येतो.
क्षारयुक्त आणि पाणथळ जमीन वगळता इतर जमिनीत ओट घेता येतो. चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य ठरते.
दुबार कापणीसाठी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करा. ३० सेंमी अंतरावर हेक्टरी १०० किलो बियाणे वापरा.
फुले हरिता, फुले सुरभी, केंट, युपीओ-०१-१ आणि जेएचओ-२००४-४ हे सुधारित वाण वापरता येतात. दुबार कापणीसाठी योग्य वाणांची निवड केल्यास अधिक हिरवा चारा मिळतो.
पेरणीपूर्वी हेक्टरी ३ ते ४ टन शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळा. दुबार कापणीच्या वाणांना १२० किलो नत्र तीन हप्त्यांत द्या.
जमीन आणि पिकाच्या गरजेनुसार साधारण १० ते १२ दिवसांनी पाणी द्या. पीक तणमुक्त ठेवण्यासाठी ३० दिवसांच्या आत एक खुरपणी करा.
दुबार कापणीच्या वाणांची पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करता येते. दुसरी कापणी त्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी घेता येते.
दुबार कापणीत हेक्टरी ५५० ते ६०० क्विंटलपर्यंत हिरवा चारा मिळू शकतो. एक कापणी घेतल्यास ७० ते ७५ दिवसांनी ४०० ते ४५० क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो.