Swarali Pawar
यंदा कमी पावसाची शक्यता असल्याने योग्य पिकांची निवड महत्त्वाची आहे. कमी पाण्यात तग धरणारी पिके आर्थिक जोखीम कमी करू शकतात.
मूग, उडीद, तूर आणि चवळी कमी पाण्यात चांगली येतात. ही पिके जमिनीत नत्र वाढवून सुपीकता सुधारण्यास मदत करतात.
ज्वारी आणि बाजरी दुष्काळी परिस्थितीतही तग धरून राहतात. यातून धान्यासोबत जनावरांसाठी चांगला चारा मिळतो.
बाजरीमधील फुले धनशक्ती हे कमी कालावधीचे वाण फायदेशीर आहे. हे वाण ७२ ते ७५ दिवसांत तयार होऊन कमी पाणी मागतात.
तीळ, जवस आणि सूर्यफूल कमी पाण्यातही चांगले उत्पादन देतात.ही पिके हलक्या जमिनीतही यशस्वीपणे घेता येतात.
ओवा, बडिशोप आणि काळेजीरे कमी पाण्यात फायदेशीर ठरतात. चिया सीडसारख्या पिकांनाही सध्या बाजारात चांगली मागणी आहे.
आवळा कमी पाण्यात येणारे आणि कमी देखभालीचे पीक मानले जाते. कोरडवाहू भागात दीर्घकालीन आर्थिक आधार मिळू शकतो.
ज्वारी + तूर किंवा बाजरी + मूग अशी आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे. एक पीक नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळू शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.