Swarali Pawar
यंदा कमी पावसाची शक्यता असल्याने सोयाबीनची पेरणी योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. यासाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
या पद्धतीत रुंद वरंब्यावर सोयाबीनची पेरणी केली जाते. दोन्ही बाजूला सऱ्या तयार केल्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते.
सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि हळूहळू जमिनीत मुरते. त्यामुळे पाऊस थांबला तरी पिकाला जास्त काळ ओलावा मिळतो.
जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर जाते. यामुळे शेतात पाणी साचत नाही आणि मुळे कुजण्याचा धोका कमी होतो.
बीबीएफ यंत्राद्वारे वरंबे तयार करणे, पेरणी आणि खत देणे एकाच वेळी शक्य होते. यामुळे खताचा योग्य वापर होऊन पिकाची वाढ चांगली होते.
योग्य खोली आणि अंतरावर पेरणी झाल्यामुळे उगवण चांगली होते. रोपांची संख्या योग्य राहून पीक जोमाने वाढते.
ओळी स्पष्ट असल्यामुळे तण नियंत्रण, कोळपणी आणि फवारणी सहज करता येते. यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होते.
ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन आणि खतांचा कार्यक्षम वापर होतो. त्यामुळे कमी पावसातही सोयाबीनचे उत्पादन चांगले आणि स्थिर मिळण्यास मदत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.