Dairy Business : गायी फायद्याच्या की म्हशी?

Team Agrowon

दूध कुठे विकायच आहे

भारतात ५५ टक्के दूध म्हशीपासून आणि ४५ टक्के दूध गायीपासून मिळत. दुग्ध व्यवसायासाठी गायी घ्यायच्या की म्हशी हे ठरत तुम्हाला दूध कुठे विकायच आहे यावर.

Dairy Business | Agrowon

विक्री

म्हशीच दूध तुम्ही थेट ग्राहकाला विकू शकता पण गायीच दूध तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकत नाही. 

Dairy Business | Agrowon

फॅटचे प्रमाण

स्थानिक डेअरी द्वारे हे दूध गोळा करुन ग्राहकांपर्यंत जात. म्हैस दूध कमी देते आणि गाय जास्त दूध देते. पण म्हशीच्या दुधात फॅट च आणि एसएनएफ च प्रमाण हे गायीच्या दुधापेक्षा जास्त असत. म्हणजे म्हशीच दूध हे घट्ट असतं. त्यामुळे म्हशीच्या दुधाला भाव जास्त मिळतो. 

Dairy Business | Agrowon

गायी, म्हशीच्या दुधातील फरक लक्षात घ्या

गायी, म्हशीच्या दुधातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे.  संकरित गाय पाळायची असेल तर ३ ते ५ हजार लिटर दूध एका वेता मध्ये मिळत. तर देशी गायीपासून एका वेतामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध एका वेतामध्ये मिळत. 

Dairy Business | Agrowon

दूध उत्पादन

तुम्ही जर म्हैस पाळणार असाल तर ही म्हैस तुम्हाला ८ ते १० महिन्यामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध देते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही ठरवायच की, तुम्हाला गायी पाळायच्या आहेत की म्हशी.

Dairy Business | Agrowon

गायी, म्हशीच प्रमाण

तुमच्या गावात जास्त म्हशी आहेत की जास्त गायी आहेत. या वरुन सुद्धा तुम्ही ठरवू शकता. 

Dairy Business | Agrowon

उन्हाळा

उन्हाळ्यात म्हशींना उष्णतेचा जास्त त्रास होतो. तुमच्या भागात जर उन्हाळा जास्त तीव्र असेल तर अशावेळी तुमच्या कडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हशींना पाणी उपलब्ध होईल का? अशा गोष्टीचा विचार करावा. 

Dairy Business | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangamneri Goat | Agrowon
आणखी पाहा...