Team Agrowon
हिरवगाव पावसा गावचे अनिल गोफणे यांच्याकडील एका शेळीने ४ तर एका शेळीने ५ करडांना जन्म दिला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातात. या प्रकल्पांतर्गत नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या साहाय्याने नामशेष होत असलेल्या जातिवंत संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या तीन हजारांवरून पाच हजारांपर्यंत नेण्यात विद्यापिठाला यश आले आहे.
या प्रकल्पांतर्गत शेळीपालकांना पैदाशीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड दिले जातात. यातूनच हिरवगाव पावसा गावचे अनिल गोफणे यांच्याकडील एका शेळीने ४ तर एका शेळीने ५ करडांना जन्म दिला आहे.
शेळ्यांमध्ये सहसा जुळी करडे देण्याच प्रमाण जास्त असतं. पण तीन ,चार , पाच आणि त्यापेक्षा जास्त करडे देण्याची प्रवृत्ती शेळ्यांमध्ये ३ ते ४ टक्के च असते. त्यात चार ते पाच करडे क्वचीतच मिळतात.
यामध्ये नर आणि मादी या दोघांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. यासह शेळ्यांचे योग्य प्रकारे आहार व्यवस्थापन ठेवणही महत्त्वाच आहे.
शेळ्यांची जनुकीय गुणवत्ता आणि त्याबरोबरच उत्तम व्यवस्थापनाची जोड असेल तर जास्त करडे एका शेळीपासून मिळू शकतात.
महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळ या शेळ्यांच्या प्रमुख चार जाती आढळून येतात. यापैकीच संगमनेरी शेळी दूध आणि मांस या दोन्ही उत्पादनासाठी वापरली जाते.