Team Agrowon
कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी देऊन पुन्हा कापूस पीक घेण्याच्या पद्धतीला फरदड कापूस म्हणतात.
फरदड पिकांमध्ये चांगल्या उत्पादनासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतर राहते.
कपाशी वेचणीनंतर रब्बी नंतरच्या हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा गोष्टींवरील खर्च वाढतो.
खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायदयाची वाटते.
फरदड पध्दतीमुळे शेतात जास्त काळ कापूस पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं.
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेतला तर तिचं चांगल नियंत्रण करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.
कपाशीची फरदड न घेता वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये.