Aslam Abdul Shanedivan
एखादे पिक असो किंवा फळ त्याच्या लागवडीसाठी योग्य हवामान लागते. पण एका शेतकऱ्याने उष्ण हवामानात सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
हा कारनामा ओडिशातील जाजपूरमध्ये मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शेतकरी रवींद्र नायक यांनी केला आहे
नायक हे जाजपूर जिल्ह्याच्या कोरेई ब्लॉक अंतर्गत दुखलापटना गावातील असून त्यांनी उन्हाळ्यात पिकणारी सफरचंदाची बाग फुलवली आहे
नायक हे सफरचंद पिकवण्यापूर्वी ते भाजीपाल्याची लागवड करायचे. मात्र पूरग्रस्त भाग असल्याने त्यांना दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागत होते.
प्रत्येक वेळी होणाऱ्या नुकसानीमुळे निराश होऊन त्यांनी पारंपरिक भाजीपाला शेती सोडून फळांच्या शेतीकडे वळण्याचा निर्धार केला.
त्यांनी सुरुवातीला पेरू, आंबा, पपई, संत्री, लिची, थायलंड बेरी लावून यातून चांगले उत्पादन मिळवले. या फळांच्या यशानंतर त्यांनी सफरचंद शेती करण्याची करण्याचा विचार केला.
नायक यांनी, २०२२ मध्ये ऍना आणि गोल्डन डोरसेट जातीच्या सफरचंदाची ६० झाडे लावली. ज्यातून ते दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.