Black Gram Varieties: एल निनोच्या संकटात उडदाचे ६ सुधारित वाण

Swarali Pawar

कमी पावसात उडीद का फायदेशीर?

उडीद हे कमी कालावधीत तयार होणारे आणि कमी पाण्यात तग धरणारे पीक आहे. योग्य वाणांची निवड केल्यास एल निनोच्या परिस्थितीतही चांगले उत्पादन मिळू शकते.

Why Black gram | Agrowon

फुले वसू

हा वाण ७० ते ७५ दिवसांत पक्व होतो. भुरी आणि पिवळ्या विषाणू रोगास प्रतिकारक्षम असून १२ ते १४ क्विंटल उत्पादन देऊ शकतो.

Phule Vasu | Agrowon

फुले राजन

२०२४ मध्ये प्रसारित झालेला हा वाण ७५ ते ८० दिवसांत तयार होतो. चमकदार दाणे आणि ८ ते १० क्विंटल उत्पादन हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

Phule Rajan | Agrowon

पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड

हा वाण ६५ ते ७० दिवसांत पक्व होतो. एकाच वेळी पक्वता येऊन १० ते १२ क्विंटल उत्पादन देऊ शकतो.

PDKV Black Gold | Agrowon

पीकेव्ही उडीद-१५

विदर्भासाठी शिफारस केलेला हा वाण ६५ ते ७० दिवसांत तयार होतो. जोमदार वाढ आणि १० ते १२ क्विंटल उत्पादनक्षमता ही याची ताकद आहे.

PKV Udid 15 | Agrowon

टीएयू-१

हा वाण ६५ ते ७० दिवसांत पक्व होतो. टपोरे दाणे आणि भुरी रोगावरील मध्यम प्रतिकारक्षमता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

TAU 1 | Agrowon

बीडीयू-१

महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला हा वाण ७० ते ७५ दिवसांत तयार होतो. यापासून हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळू शकते.

BDU 1 | Agrowon

वाण निवडताना हे लक्षात ठेवा

आपल्या क्षेत्रासाठी शिफारस केलेले वाणच निवडा. कमी कालावधीचे आणि रोगप्रतिकारक्षम वाण उत्पादनाचा धोका कमी करतात.

Variety Selection | Agrowon

Plant Population: रोपसंख्या का महत्त्वाची? उत्पादन वाढवण्यासाठी ७ महत्त्वाच्या गोष्टी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...