Swarali Pawar
एक एकर किंवा हेक्टरमध्ये असलेल्या एकूण रोपांच्या संख्येला रोपसंख्या म्हणतात. योग्य रोपसंख्या ही पिकाच्या अंतर आणि वाढीवर अवलंबून असते.
योग्य रोपसंख्येमुळे प्रत्येक रोपाला हवा, पाणी आणि अन्नद्रव्ये पुरेशी मिळतात. यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि उत्पादन वाढते.
रोपांची दाटी झाल्यास अन्नद्रव्ये आणि प्रकाशासाठी स्पर्धा वाढते. यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनातील घट होऊ शकते.
कमी रोपसंख्येमुळे जमिनीचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही. उपलब्ध पाणी आणि खतांचा अपुरा वापर होऊन उत्पादन घटते.
प्रमाणित आणि उगवणक्षम बियाण्यांची निवड करावी. बीजप्रक्रियेमुळे उगवण सुधारते आणि रोपांचे संरक्षण होते.
पिकानुसार शिफारशीत अंतर आणि ३ ते ५ सेंमी खोलीवर पेरणी करावी. यामुळे प्रत्येक रोपाला वाढीसाठी पुरेशी जागा मिळते.
उगवणीनंतर रोपसंख्या तपासून विरळणी करावी. जिथे रोपे कमी असतील, तिथे त्वरित पुनर्लागवड करावी.
कीड-रोगांचे नियमित निरीक्षण करून नियंत्रण करावे. योग्य रोपसंख्या राखल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ मिळू शकते.