Anuradha Vipat
घरचे खडे मसाले वर्षभर नव्हे तर तब्बल २ ते ३ वर्षे ताजे आणि सुगंधी ठेवता येतात.
खड्या मसाल्यांमध्ये नैसर्गिक सुगंधी तेले सुरक्षित असतात, त्यामुळे ते दळलेल्या मसाल्यांपेक्षा जास्त काळ टिकतात.
जर साठवणूक व्यवस्थित झाली नाही तर त्यांना जाळे लागणे, बुरशी येणे किंवा त्यांचा सुगंध उडून जाणे अशा समस्या उद्भवतात.
मसाले डब्यात भरण्यापूर्वी २ ते ३ दिवस कडक उन्हात चांगले सुकवून घ्या. यामुळे मसाल्यांमधील अंतर्गत ओलावा पूर्णपणे निघून जातो.
खडे मसाले साठवण्यासाठी काचेच्या बरण्या किंवा चांगल्या दर्जाचे पांढरे/स्टीलचे हवाबंद डबे वापरा.
अनेक जण कपाटात गॅस शेगडीच्या अगदी जवळ किंवा वरच्या कप्प्यात मसाले ठेवतात. शेगडीच्या उष्णतेमुळे मसाल्यांमधील सुगंधी तेले नष्ट होतात.
वर्षभराचा साठवणीचा मोठा डबा वारंवार उघडू नका. हवा लागल्यास मसाले खराब होतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.