Anuradha Vipat
आजकालच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत निरोगी राहणे हे एका मोठ्या आव्हानासारखे झाले आहे. Less Oil Cooking
जेव्हा तुम्ही कांदा, आले-लसूण पेस्ट कढईत टाकाल, तेव्हा सुरुवातीला फक्त अर्धा चमचा तेल वापरा. त्यात १-२ चमचे कोमट पाणी किंवा टोमॅटो प्युरी घाला. यामुळे मसाला करपत नाही आणि त्याची मूळ चव व सुगंध भाजीमध्ये जसाच्या तसा उतरतो.
चांगल्या दर्जाची नॉन-स्टिक भांडी, सिरॅमिक कोटिंगची भांडी किंवा हेवी बॉटम असलेली लोखंडी कढई वापरा. या भांड्यांमध्ये अगदी काही थेंब तेलातही भाज्या आणि मसाले छान परतून निघतात.
ऑईल स्प्रे चा वापर करा. स्प्रे केल्याने तेल कढईत समप्रमाणात पसरते आणि खूप कमी प्रमाणात वापरले जाते.
कच्च्या भाज्या थेट तेलात शिजवण्याऐवजी त्या आधी हलक्या वाफेवर शिजवून घ्या किंवा पाण्यात उकडून घ्या. यामुळे भाज्यांमधील पोषक तत्वे नष्ट होत नाहीत .
जेवणात तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी मसाल्यांमध्ये भाजलेले तीळ, खसखस, ओले नारळ किंवा कसुरी मेथी बारीक करून घाला.
चिवडा, पापड, कटलेट किंवा समोसे तेलात तळण्याऐवजी ओव्हनमध्ये बेक करा किंवा एअर फ्रायरचा वापर करा.