Fertilizer Management: कमी खतांतही घ्या भरघोस उत्पादन!

Swarali Pawar

खतांचा खर्च वाढलाय?

खतांचे दर आणि उपलब्धतेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय. पण योग्य नियोजन केल्यास कमी खतांतही चांगले उत्पादन मिळू शकते.

Fertilizer Cost | Agrowon

बीजप्रक्रिया का गरजेची?

पेरणीपूर्वी बियाण्यांवर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे पिकांना नैसर्गिकरित्या नत्र मिळून खतांची बचत होते.

Why Seed treatment is importent | Agrowon

जिवाणू खतांचा फायदा

अझाटोबॅक्टर, रायझोबियमसारखे जिवाणू हवेतले नत्र स्थिर करतात. यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर २० ते २५ टक्क्यांनी कमी होतो.

Use of Biofertilizer | Agrowon

सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

शेणखत, गांडूळ खत आणि कंपोस्ट मातीची सुपीकता वाढवतात. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि ओलावा टिकून राहतो.

Use of Organic Fertilizer | Agrowon

माती परीक्षण महत्त्वाचे

माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करणे फायदेशीर ठरते. यामुळे गरजेपुरतेच खत वापरून खर्च कमी करता येतो.

Soil Testing | Agrowon

संतुलित खत व्यवस्थापन करा

फक्त युरियावर भर न देता स्फुरद आणि पालाशही द्यावे. संतुलित खतांमुळे कमी खतांतही चांगले उत्पादन मिळते.

Fertilizer Management | Agrowon

ठिबकद्वारे विद्राव्य खते द्या

ठिबक सिंचनातून दिलेली खते थेट मुळांपर्यंत पोहोचतात. यामुळे खतांचा अपव्यय कमी होऊन कार्यक्षमता वाढते.

Fertilizer with Drip Irrigation | Agrowon

कमी खतांतही भरघोस उत्पादन

बीजप्रक्रिया, सेंद्रिय खते आणि ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहते आणि खर्चही कमी होतो.

Low Fertilzer High yield | Agrowon

Crop Rotation: पिकांची फेरपालट का गरजेची? जाणून घ्या योग्य पीक क्रम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...