Swarali Pawar
सतत एकच पीक घेतल्याने जमिनीची ताकद कमी होऊ लागते. म्हणूनच योग्य फेरपालट केल्यास उत्पादन आणि सुपीकता टिकते.
दरवर्षी एकाच जमिनीत वेगवेगळी पिके आलटून-पालटून घेणे म्हणजे फेरपालट. एकदल पिकानंतर द्विदल पीक घेणे अधिक फायदेशीर ठरते.
गहू, ज्वारी, मका, भात ही एकदल पिके अन्नद्रव्य जास्त वापरतात. मूग, उडीद, तूर, हरभरा ही द्विदल पिके जमिनीत नत्र वाढवतात.
फेरपालटीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन वाढते. यामुळे कीड, रोग आणि तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो.
कडधान्य पिकांच्या मुळांवर रायझोबियमच्या गाठी तयार होतात. हे जिवाणू हवेतले नत्र जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात.
हरभऱ्यानंतर मका, सोयाबीन किंवा ज्वारी घेता येते. ज्वारी किंवा गव्हानंतर मूग, उडीद, चवळी फायदेशीर ठरते.
कापसानंतर गहू किंवा हरभरा घ्यावा अशी शिफारस केली जाते. उसानंतर कडधान्य तर भातानंतर हरभरा किंवा भाजीपाला योग्य ठरतो.
सतत एकाच प्रकारची पिके घेणे टाळणे गरजेचे आहे. योग्य फेरपालट आणि विश्रांतीमुळे जमीन निरोगी राहते.