नवापूर तालुक्यातील पालीपाडा महिला शेतकरी गटाने केलेले बीजोत्पादन
नवापूर तालुक्यातील पालीपाडा महिला शेतकरी गटाने केलेले बीजोत्पादन  
यशोगाथा

शेतकरी गटांच्या माध्यमातून दर्जेदार कांदा लसूण बीजोत्पादन

Chandrakant Jadhav

आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यातील दहा गावांमध्ये ५० शेतकरी गटांच्या माध्यमातून कांदा व लसूण बीजोत्पादन उपक्रम येथील कृषी विज्ञान केंद्राच्या साथीने राबवला जात आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाकडून हे बियाणे हमी भावाने खरेदी केले जाते. या उपक्रमातून शेतकऱ्यांना दरवर्षी खात्रीचा उत्पन्नस्त्रोत मिळून अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.   नंदूरबार जिल्हा सातपुडा पर्वताच्या डोंगरदऱ्या, तापी नदीकाठचा सपाट भूप्रदेश. नंदूरबार व शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग अवर्षण प्रवण. नवापूरच्या पश्‍चिम भागात पाऊसमान बरे असल्याने भातशेती मुख्य असते. रब्बीत थोडा भाजीपाला, हरभरा, मका, भुईमूग आदी पिके. बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक व आदिवासी. पाण्याचे स्त्रोत बरे. मात्र त्यांचा कार्यक्षम उपयोग करून नवी पिके, नवे तंत्रज्ञान याबाबत पूर्वी ते फारसे सकारात्मक नव्हते. बीजोत्पादन पार्श्वभूमी नवापूर तालुका - हवामान अत्यंत पोषक. रासायनिक कीडनाशकांचा वापर जवळपास नाही. मधमाशांची संख्या मोठी. त्यामुळे एका तपाहून आधीच्या काळात या भागात कांदा बीजोत्पादन उपक्रम राबवण्यास सुरूवात झाली. सध्याचा उपक्रम दृष्टिक्षेपात १) संस्थात्मक जबाबदाऱ्या

  • प्रकल्प जबाबदारी - कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, जि. पुणे
  • गेल्या पाच वर्षांपासून आदिवासी उपयोजनेचा लाभ
  • तांत्रिक मार्गदर्शन, सेवा- कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार (केव्हीके)
  • केव्हीकेतील तज्ज्ञांचा या भागाचा दांडगा अभ्यास, शेतकऱ्यांशी तयार झालेले दृढसंबंध याचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी फायदा
  • २) शेतकऱ्यांचा समावेश

  • नवापुर तालुका - १० गावे 
  • शेतकरी संख्या - ५०० 
  • शेतकरी गट सुरवातीला ५ सद्यस्थितीला - ५०- प्रति गट १० शेतकरी
  • ४० महिला शेतकऱ्यांचा सहभाग.
  • चार महिला शेतकरी गट- पालीपाडा, करंजाळी व श्रावणी
  • ३) पीक जाती

  • कांदा - भीमा शक्ती, भीमा लाईट रेड, भीमा श्‍वेता, भीमा किरण, भीमा राज, भीमा शुभ्रा
  • लसूण - भीमा पर्पल व ओंकार
  • ४) तंत्रज्ञान- मुख्य बाबी

  • उंच गादीवाफा- १.२ मीटर रुंद व १५ सेंटिमीटर- त्यालगत ४५ सेंमी. सरी
  • ठिबकमुळे पाण्याची ४० टक्के बचत, २० टक्के उत्पादन वाढ, खतांचा कार्यक्षम वापर, मजुरी खर्चात ३० टक्के बचत या बाबी साधणे शक्‍य झाले.
  • ५ ) क्षेत्र, उत्पादन कांदा बीजोत्पादन 

  • गट - १० शेतकरी- एक एकर- सरासरी एकूण क्षेत्र- १० एकर
  • उत्पादन - एकरी- २ ते ४ क्विंटल
  • उत्पादन खर्च - जवळपास सर्व निविष्ठा योजनेंतर्गत दिल्या जातात. त्यामुळे अत्यंत कमी.
  • ६) दर व उत्पन्न

  • राजगुरूनगर येथील संस्था अाणि शेतकरी
  • बियाणे दर - ५०० रुपये प्रति किलो- बायबॅक गॅरंटी
  • उत्पादन दोन ते तीन क्विंटल गृहीत धरता हमीदरामुळे एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न
  • लसूण उत्पादन - एकरी दीड ते पावणेदोन क्विंटल
  • योजनेंतर्गत फायदे

  • श्रावणी, खडकी, पळसूल या तीन गावांमध्ये १० गटांना बांबूच्या १० कांदाचाळी.
  • सहा मीटर लांब व दीड मीटर रुंदीची चाळ- क्षमता- पाच टन.
  • प्रति चाळ खर्च- १४ हजार रु.
  • राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने हे तंत्र उपलब्ध केले. स्थानिक कारागिराच्या मदतीने चाळी उभारल्या.
  • तीस गटांना सूक्ष्मसिंचन यंत्रणा शंभर टक्के अनुदानावर.
  • पंधरा गटांना उंच गादीवाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित रिजर. प्रति रिजर किंमत ३५ हजार रु. तर ३३ बॅटरीचलित फवारणी पंप.
  • शेती नव्हे, प्रयोगशाळाच बीजोत्पादनासाठी काही सदस्य आपली जमीन पाच वर्षे भाडेतत्त्वावर गटाला देतात. यासाठी पाचहजारांपासून ते दहा हजार रुपये प्रति वर्ष असे दर. ही शेती गावातील अन्य शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळाच किंवा प्रात्यक्षिके क्षेत्रच असते. दर महिन्याच्या पीक पाहणी कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले जाते. त्यातूनच भागात कांदा उत्पादकांची संख्या वाढली. विसरवाडी व खांडबारा भागात आजमितीस सुमारे २५० हेक्‍टरवर कांदा उत्पादन. उल्लेखनीय बाबी

  • गटशेती रुजल्याने करंजाळी (ता. नवापूर) येथील किसन वळवी यांनी नेसू शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्यामाध्यमातून ‘राईस मिल’ उभारली जात असून त्यात २०० शेतकरी सभासद आहेत. वळवी मंगलमूर्ती गटाचे प्रमुख आहेत.
  • पालीपाडा येथील अर्चना वळवी यांच्या सरस्वती महिला बचत गटाने एकरी तीन क्विंटलपेक्षा कांदा बिजोत्पादन तर याच गावातील हरीश वळवी व त्यांच्या याहामोरानी गटाने एकरी २० टन कांदा उत्पादन घेतले. त्यासाठी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने त्यांचा सत्कार केला आहे.
  • प्रतिक्रिया नवापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी चार क्विंटल कांदा बीजोत्पादन घेण्यापर्यंत यश मिळविले आहे. या उपक्रमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. - डॉ. ए. जी. गुप्ता, प्रमुख शास्त्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन संचालनालय   गटशेतीची संकल्पना राबविणे शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळे शक्‍य झाले. हा उपक्रम यशस्वी होत गेल्याने पाच वर्षांत ५० शेतकरी गट स्थापन होऊ शकले. नवापूर तालुक्‍यात कांदा बीजोत्पादनासाठी मधमाशांची संख्या व बीजोत्पादन प्लॉटच्या विलगीकरणाची संधी चांगली आहे. आर. एम. पाटील, विषय विशेषज्ञ, केव्हीके, नंदुरबार ९८५०७६८८७६ नव तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदा बीजोत्पादन प्रभावीपणे राबवित आहोत. यातून आर्थिक स्त्रोत व रोजगार उपलब्ध झाला आहे. - अर्चना वळवी, प्रमुख, सरस्वती महिला शेतकरी गट, पालीपाडा एकरी १२ टन कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेतो. गटशेतीमुळे शेतकरी एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यातून प्रश्‍न लवकर सुटतात. - संदीप कोकणी, प्रमुख, साई शेतकरी मंडळ, श्रावणी  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

    Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

    Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

    Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

    Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

    SCROLL FOR NEXT