अकोला जिल्ह्यात निवडणुकांची धूम
अकोला जिल्ह्यात निवडणुकांची धूम 
यशोगाथा

अकोला झेडपीसाठी ५८२, समित्यांसाठी ७४८ उमेदवारी अर्ज

टीम अॅग्रोवन

अकोला  ः ७ जानेवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची एकच गर्दी उसळली होती. अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ गटांमध्ये विविध राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार मिळून ५४० उमेदवारांनी ५८२ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पंचायत समितींच्या १०६ गणांतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या ७२१ उमेदवारांचे ७४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरपासून कार्यक्रम लागू झाला आहे. या निवडणुकीसाठी सोमवार (ता. २३) हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ७५ उमेदवारांनी ७९ अर्ज दाखल केले. तर पंचायत समितीच्या गणांसाठी १०८ उमेदवारांचे तितकेच अर्ज आले. अकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटांसाठी १०० उमेदवारांनी १०७ तर पंचायत समितीच्या गणांसाठी ११४ उमेदवारांचे ११९ अर्ज, मूर्तिजापूरमध्ये गटांमध्ये ५६ उमेदवारांनी ६३ तर पंचायत समितीच्या गणांसाठी ९५ उमेदवारांनी १०१ अर्ज, अकोला तालुक्यात गटांसाठी ११० उमेदवारांनी ११५ तर पंचायत समितीच्या गणांसाठी १२६ उमेदवारांनी १२७ अर्ज, बाळापूरमध्ये गटांसाठी ७२ उमेदवारांनी ८१ तर पंचायत समितीच्या गणांसाठी ९९ उमेदवारांनी १०३ अर्ज दाखल केले. बार्शिटाकळी तालुक्यात जिल्हा परिषदच्या गटांसाठी ६९ उमेदवारांनी ७५ तर पंचायत समितीच्या गणांसाठी १०४ उमेदवारांनी १०७ अर्ज दाखल केले आणि पातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ५८ उमेदवारांनी ६२ तर पंचायत समितीच्या गणांसाठी ७५ उमेदवारांनी ८३ अर्ज दाखल केले आहेत. दाखल अर्जांपैकी किती जण रिंगणात राहतात हे एक जानेवारीनंतर स्पष्ट होईल. एक जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. राजकीय पक्षांनी कापले विद्यमानांचे पत्ते  या निवडणुकीत राजकीय पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. गेल्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बहुतांश उमेदवारांना उमेदवारी नाकारण्याचे काम पक्षांनी केले. शिवाय स्थानिक पातळीवर वलय असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे बंडखोरीची शक्यता वाढली आहे. काही दिग्गज पक्षाने उमेदवारी नाकाराल्याने अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात.  अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय गट व गण

तालुका गट  गण
तेल्हारा १६
अकोट १६
मूर्तिजापूर १४
अकोला १० २०
बाळापूर १४
बार्शिटाकळी १४
पातूर १२ 
एकूण ५३ १०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT