शुभम महल्ले यांची ब्रॉयलर पक्ष्यांची पोल्ट्री
शुभम महल्ले यांची ब्रॉयलर पक्ष्यांची पोल्ट्री 
यशोगाथा

तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार वाटचाल

Gopal Hage

शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने २०१७ मध्ये तीन लाखांची गुंतवणूक करीत ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगात पाऊल ठेवले. अतीव कष्ट, चौफेर अभ्यास, बाजारपेठा व व्यापाऱ्यांचे नेटवर्क, तंत्रज्ञान वापर आदींमधून वर्षाला दोन शेड्‌समध्ये १० बॅचेसमध्ये उत्पादन घेत १० ते १२ मासिक उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. सध्याच्या युवा पिढीसाठी त्याचा आदर्श दिशादर्शक आहे.   अकोला जिल्ह्यात शिवपूर (ता. अकोट) हे सातपुडाच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. येथील शुभम महल्ले हा सुमारे २३ वर्षे वयाचा तरुण आज ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगात आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करीत आहे. मे २०१७ मध्ये तीन लाखांची गुंतवणूक करीत त्याने पोल्ट्री उद्योगात पाऊल ठेवले. स्वतःच्या शेतात उभारलेल्या शेडमध्ये पाचशे पक्ष्यांपासून सुरुवात केली. त्याचे वडील बाळकृष्ण कृषी खात्यात चालक म्हणून नोकरीला आहेत. त्यांना नोकरीमुळे घरच्या शेतीकडे पुरेसे लक्ष देता येत नव्हते. पोल्ट्रीची दिशा शुभम शालेय शिक्षणासाठी २०११ मध्ये मामाच्या गावी (दर्यापूर तालुका) गेला असताना तेथे पोल्ट्रीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. शिक्षणानंतर गावी परतून वयाच्या १९ व्या वर्षीच त्याने पोल्‍ट्रीफार्म उभारला. काही वडिलांकडून तर काही शेतीतील उत्पन्न असे तीन लाख रुपये गुंतवले. अमरावती येथून पिले व खाद्य घेतले. स्वतःची फीडमिल शुभमने छोट्यातून मोठ्याकडे वाटचाल सुरु केली. उत्पन्नातून २०१९ मध्ये तीन हजार पक्ष्यांच्या क्षमतेचे शेड उभारले. सन २०२० मध्ये ४००० पक्षांचे शेड उभे केले. आता पुन्हा तेवढ्याच क्षमतेचे शेड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. जसजसा अनुभव वाढला तसे उत्पन्नाचे स्रोत तो बळकट करीत आहे. शुभम सांगतो की पोल्‍ट्री व्यवसायात खाद्यावर सर्वाधिक (सुमार ७० टक्के) खर्च होतो. सध्या तर हा खर्च अफाट वाढला आहे. तो कमी करण्यासाठी स्वतःची फीडमिल युनिट उभारून खाद्यात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न आहे. मक्याची स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी होते. त्यातून शेतकऱ्यांना चांगले दर मिळतात. बाजारात विक्रीची गरज भासत नाही. सोयाबीन ढेप अकोला तर प्रीमिक्स नागपूरवरून मागवण्यात येते. तयार खाद्य घेण्यापेक्षा त्यावर दररोज पाच हजार रुपयांची बचत साधणे त्यामुळे शक्य झाले आहे. संकटातही टिकून दोन वर्षे कोरोना व बर्ड फ्लू संकटामुळे शुभम यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाजारातील उठावच थांबला. व्यापारी फिरकत नव्हते. १० रुपये प्रति पक्षी इतका दर घसरला. शुभमकडे ६००० पक्षी होते. आपल्या अनुभवाचा कस लावत त्याने स्वतः मार्केटिंग करीत परिसरातील गावांमध्ये ४८ रुपये प्रति किलो दराप्रमाणे विक्री केली. बर्ड फ्लू काळात किलोमागे ७५ रुपये खर्च झालेले पक्षी तयार असताना ५० ते ६० रुपये दराने विकणे भाग पडले. आता पोल्ट्री सावरली असून, आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्याचे शुभम सांगतो. सध्याचा व्यवसाय- ठळक बाबी

  • ‘शुभ’ असे पोल्ट्री फार्मचे नाव. प्रत्येकी पाच हजार पक्ष्यांच्या दोन शेड्‌स. वर्षाला प्रति शेडमध्ये चार अशा एकूण आठ बॅचेसमधून उत्पादन. प्रति बॅच ४५ दिवसांची. त्या वेळी पक्ष्यांचे वजन ३ ते २ किलोपर्यंत होते. (ऋतूनुसार)
  • शेडमध्ये पंखे, फॉगर्स, खाद्य-पाणी (स्वयंचलित) आदी आधुनिक व्यवस्था.
  • स्थानिक बाजारपेठेसह मध्य प्रदेशात खंडवा, बऱ्हाणपूर येथे ठोक व्यापाऱ्यांना विक्री. व्यापारी थेट संपर्क करीत पक्षी नेत असल्याने मार्केटिंगची समस्या मिटली.
  • वर्षभर दरांत चढ-उतार होतात. मात्र रेंज किलोला ६५, ७० रुपयांपासून ११० ते ११५ रु.
  • काही वेळा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दराने विकण्याची वेळ.
  • मासिक उलाढाल- १० ते १२ लाख रु.
  • नफा- सुमारे २० ते २५ टक्के
  • शुभम सोबतच्या पोल्ट्रीधारकारांना खाद्य, चिक्स मिळवून देण्यासही मदत करतो. खाद्य कंपनीचे कामही मिळाले आहे.
  • व्यवसायातून आदिवासी कुटुंबाला व एकूण चार जणांना रोजगार मिळाला.
  • सर्व नोंदींचा तपशील शुभमकडे पोल्ट्रीच्या प्रत्येक बॅचची, प्रत्येक बारीकसारीक खर्चाची दिवसनिहाय नोंद पाहण्यास मिळते. पशुखाद्य, मजुरी, विक्री, आलेले पैसे अशा विविध नोंदीसाठी वही तयार केली आहे. व्यवसायाच्या बँक खात्याचा रीतसर व्यवहार तो करतो. दरवर्षी ‘रिटर्न’ भरतो. शेतीचीही जबाबदारी शुभमने घरच्या शेतीचीही जबाबदारी सांभाळली आहे. बागायती कपाशी, दोन वर्षांपूर्वी दोन एकरांत संत्रा लागवड आहे. मागील वर्षापासून रासायनिक खताचा वापर कमी करून कोंबडीखताचा वापर सुरू केला आहे. आता जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी अन्य शेतकऱ्यांना जेथे सोयाबीन एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत मिळाले तेथे शुभमला एकरी आठ क्विंटलपर्यंत उतारा मिळाला. शेती व पोल्ट्री व्यवसायात आर्थिक नियोजन उत्तम केल्याने शुभमला १० लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी खरेदी करणे शक्य झाले. त्यासाठी सहा लाख रुपये स्वतःजवळचे तर चार लाख बँकेकडून घेतले. संपर्क- शुभम महल्ले- ९६०४७३८५९१ प्रतिक्रिया ग्रामीण भागात पोल्ट्री व्यवसायात रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे. हा व्यवसाय तेजीमंदीशी निगडित आहे. त्यास शासनाने पाठबळ दिल्यास माझ्यासारखे अनेक तरुण पुढे जातील. त्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्याची आवश्‍यकता आहे. -शुभम महल्ले 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT