केळीची काटेकोर शेती करून नियार्तक्षम उत्पादन पाटील यांनी मिळवले. 
यशोगाथा

जमिनीची सुपिकता व काटेकोर शेतीचा ध्यास

Chandrakant Jadhav

दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न देऊ शकेल अशा प्रकारे पिकाची निवड करायची, त्याचे एकरी उत्पादनही त्याच प्रकारे वाढवायचे, अशा प्रकारे शेतीची रचना नारोद (जि. जळगाव) येथील युवा शेतकरी जितेंद्र रामलाल पाटील यांनी स्थापित केली आहे. जमिनीची सुपिकता वाढविणे व काटेकोर शेतीची सूत्रे अवलंबिणे याच दोन मुख्य बाबींवर त्यांनी शेतीचा पाया भक्कम केला आहे.   जळगाव जिल्ह्यातील नारोद (ता. चोपडा) हे गाव चोपडा शहरापासून सुमारे सहा किलोमीटरवर आहे. सातपुडा पर्वतालगत असलेल्या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजारांपर्यंत आहे. काळी कसदार जमीन गावाच्या आजूबाजूला आहे.

माती सुधारण्याला प्राधान्य गावातील जितेंद्र पाटील यांची सुमारे २३ एकर शेती आहे. तसेच सुमारे ३३ एकर शेती ते ‘लीज’ पद्धतीने करतात. सुमारे ११ वर्षांपासून शेतीची जबाबदारी ते लहान बंधू अरविंद यांच्या सोबतीने समर्थपणे सांभाळत आहेत. पूर्वी पाटील यांच्या जमिनीचा कस चांगला नव्हता. जेमतेम उत्पादन आणि उत्पन्न हाती यायचे. अशीच शेती कायम राहिली तर जगाच्या आपण मागे पडू, असे जितेंद्र पाटील यांना वाटले. त्यांनी सुरू केली मातीपासून सुधारणा.

यात काय केले?

  • मातीचा निचरा चांगला होत नव्हता. तो होण्यासाठी चुनखडीयुक्त मातीचा वापर केला.
  • शेणखत एकरी सहा ट्रॉली वापर. (आजही तो कायम)
  • जीवामृत दर महिन्याने.
  • पिकाला जेवढी गरज तेवढेच पाणी व तेवढेच रासायनिक खत.
  • प्रत्येक पिकाचा सूक्ष्म अभ्यास, शास्त्रीय पद्धतीने वा काटेकोर शेतीचा अंगीकार.
  • दीर्घ अनुभव हादेखील ठरला गुरू.
  • पीक पद्धतीची वैशिष्ट्ये

  • केळी- दरवर्षी सुमारे १८ एकर, लागवड ते काढणीपर्यंतचे ‘फ्रूट केअर’ तंत्रज्ञान आत्मसात करून निर्यातक्षम उत्पादन- एकरी ३० ते ३२ टन.
  • सुमारे १२ एकर तैवान पपई- एकरी ४० टन उत्पादन. एका प्रयोगात ते ६० टनांच्या आसपासही पोचले होते.
  • पपई, मिरची, वांगी आदींची नर्सरी- त्यातून वर्षाला अतिरिक्त उत्पन्नाची जोड.
  • हरभरा- १० ते १२ एकरांवर- पाच बाय एक फुटावर सरीत दोन ओळी लागवड. एकरी सात- आठ क्विंटल उत्पादन.
  • अॅपल बोरचाही नवा प्रयोग, शिवाय कांदा व हळद.
  • पेरू- आठ बाय पाच फूट अंतरावर सघन पद्धतीने लागवड. एकरात सुमारे १०८९ झाडे. पहिल्या बहाराचे उत्पादन घेतले आहे. सुरवातीला दररोज ५० ते ६० क्रेट मिळणारे उत्पादन आता २० क्रेटपर्यंत मिळते. सरासरी २५० ते ३०० ग्रॅम तर कमाल वजन ७०० ग्रॅम मिळाले आहे. नजीकच चोपडा येथे विक्री केली जाते.
  • टोमॅटोतील विशेष बाबी

  • टोमॅटो- दरवर्षी साडेतीन ते चार एकरांवर लागवड- उत्पादन एकरी ६० टन घेण्याची क्षमता.
  • मल्चिंग, ड्रीप व गादीवाफ्यावर सप्टेंबरच्या अखेरीस वा ऑक्‍टोबरच्या मध्यात पाच बाय दोन फूट अंतरात लागवड. टोमॅटोच्या प्रति झाडाला १० चौरस फूट जागा मिळेल असे नियोजन.
  • लागवडीपूर्वीच टोमॅटोसंबंधीचे पहिल्या ते शेवटच्या दिवसापर्यंतचे नियोजन वही किंवा पुस्तिका बनवून करण्यात येते.
  • एका झाडानजीक दोन ओळींमध्ये दोन बांबू व चार तार बांधून वेलींना ताण. यातून झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था. एक तार प्रत्येकी अडीच फुटांवर तर दुसरी चार फुटांवर.
  • दोन बांबूंचा आधार झाडाला. यात हवा चांगली खेळती राहते. रोग, फूलगळ यांचे प्रमाण कमी राहते. शिवाय दर्जा राखता येतो. त्यांचे हे तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी मध्य प्रदेश व खानदेशातील शेतकरी भेट देतात.
  • चोख व्यवस्थापनातील बाबी

  • खते देण्याचे वेळापत्रक तीन टप्प्यांत तयार केले आहे. विद्राव्य खतांचाही वापर होतो.
  • नारोद व परिसरात पाण्याची कमतरता होती. त्यामुळे माचले (ता. चोपडा) येथे कूपनलिका तयार केली. सुमारे १२ लाख रुपये खर्चून शेतापर्यंत चार इंची जलवाहिनी करून घेतली.
  • 'लीज’वरील ३३ एकरसह स्वःमालकीच्या २३ एकरांतही ‘ड्रीप’
  • मार्केट स्थानिक मार्केट उपलब्ध आहेच. शिवाय टोमॅटोला सुरतचे (गुजरात) मार्केट मिळाले आहे. सुरतचे व्यापारी मालाची आगाऊ नोंदणी करतात. प्रति क्रेट ३८ रुपये भाडेवाहतुकीसाठी तर भाड्यापोटी प्रति क्रेट आठ रुपये द्यावे लागतात. क्रेट व्यापाऱ्यांकडून उपलब्ध होतात. केळी नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीला पुरविली जातात. किलोला साडेसाेळा रुपये दर मागील वेळी मिळाल्याचे पाटील म्हणाले. पेरूला किलोला २० रुपये दर मिळाला आहे. परिसरातील नामवंत कंपनीही प्रक्रियेसाठी काही माल घेत असल्याचे विक्रीची शाश्वती मिळते असे पाटील म्हणाले.

    संपर्क- जितेंद्र पाटील - ९८२२८५६२३८

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Rate: कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

    Agriculture Ministry: शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते: कोकाटे

    Monsoon 2025: जुलैअखेर मॉन्सून काठावर पास

    Maharashtra Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता कायम

    Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

    SCROLL FOR NEXT