सुमारे ५० एकरांतील संत्रा बागेचे व्यवस्थापन ललित मडगे सांभाळतात.
सुमारे ५० एकरांतील संत्रा बागेचे व्यवस्थापन ललित मडगे सांभाळतात.  
यशोगाथा

बहुविध पीकपद्धतीसोबतच राखले जमिनीचे आरोग्य

Vinod Ingole

संयुक्त कुटुंबपद्धतीच्या शंभर एकर क्षेत्रात बहुविध पीकपद्धती व त्यातील व्यवस्थापनाचा आदर्श अचलपूर (जि. अमरावती) येथील ललित मडगे यांनी जपला आहे. संत्रा हे मुख्य पीक ठेवत जमिनीची सुपीकता राखण्यासाठी ५० एकरांवर हिरवळीची पिके, धरणातील गाळाचा वापर, शेणखताच्या उपलब्धतेसाठी पशुपालकासोबत करार, मजुरांसाठी निवासी व्यवस्था आदी वैशिष्ट्यांची जपणूकही त्यांनी केली आहे. शेतकरी- ललित मडगे ठिकाण- अचलपूर, जि. अमरावती शेती- १०० एकर (संयुक्त कुटुंबाची) पीकपद्धती संत्रा

  • ५० एकरांवर संत्रा. वाण- नागपूरी. सुमारे सहा हजार झाडे. (३०, २५ ते पाच वर्षांपर्यंतची)
  • जमिनीचा पोत राखला तरच फळांचा दर्जा आणि उत्पादकता शक्‍य होईल या जाणिवेतून
  • सेंद्रिय अधिक रासायनिक पद्धतीचे व्यवस्थापन
  • आंबिया बहारातील उत्पादन
  • प्रतिझाड (१५ वर्षांचे) उत्पादन- १२०० फळे
  • अनेक वर्षांपासून संत्रा पिकात सातत्य असल्याने थेट दिल्लीला पुरवठा
  • फळांचा दर्जा राखला जात असल्याने मालाला दरवर्षी मागणी
  • किलोला १५, २० ते कमाल ४० रुपयांपर्यंत दर
  • रोपवाटिका व्यवसाय संत्रा शेतीला उत्पन्नाचा आधार त्यातून दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अकोट (अकोला) हा परिसर संत्र्यासाठी ओळखला जातो. विदर्भातील एकूण दीड लाख हेक्‍टरपैकी सुमारे ८४ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड याच भागात आहे. त्यामुळे या भागात संत्रा रोपांना मागणी राहते, हे लक्षात घेत ललित यांचे वडील रमेशराव यांनी ३५ वर्षांपूर्वी संत्रा रोपविक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला सुमारे २५ हजार रोपे तयार करून त्यांची विक्री व्हायची. आज व्यवसायाचा चांगला विस्तार केला आहे. रंगपूर या खुंटावर कलम केले जाते. विक्री प्रतिकलम २५ रुपये याप्रमाणे होते. केळी

  • दरवर्षी साधारण सहा एकर क्षेत्र. ग्रॅंड नैन वाण. या पिकात अनुभव १५ वर्षे.
  • प्रतिझाड २५ ते ३० किलोची रास.
  • व्यापारी बांधावर येऊन कटाई करून घेऊन जातो. विक्रीची समस्या नाही.
  • फूल शेती

  • सुमारे ८ वर्षांपासून एक एकर गुलाब. यंदा काढणी करणार.
  • महिन्याला ४००० फुलांचे उत्पादन. मात्र वर्षातील आठ महिनेच असे उत्पादन.
  • स्थानिक मार्केट- परतवाडा (सुमारे पाच कि.मी.)
  • दर- दोन ते २.५ रुपये प्रतिनग
  • दरवर्षी चार एकरांवर झेंडू. दसरा, दिवाळीसाठी.
  • हळद

  • गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्य. सुमारे पाच ते सहा एकर क्षेत्र.
  • वाण- सेलम. विक्री मराठवाड्यातील वसमत, हिंगोली बाजारपेठेत.
  • व्यापाऱ्यांशी संवाद साधून दर जाणून घेत त्यानंतरच बाजारपेठेचा पर्याय
  • उत्पादकता- एकरी २२ ते २५ क्विंटल. सुकलेली.
  • मागील वर्षी हळकुंडांना ६५ रुपये प्रति किलो दर मिळाला.
  • मिरची

  • दरवर्षी चार एकरांवर खरिपात लागवड
  • एकरी उत्पादन २०० क्‍विंटल
  • विक्री नागपूर, अमरावती बाजारात
  • एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च. दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न
  • टोमॅटो, फ्लॉवर आदींमध्येही सातत्य. स्थानिक बाजारपेठेतच विक्री
  • भाजीपाला विक्रीतून मिळणारा पैसा दैनंदिन गरजांची पूर्तता तसेच शेती व्यवस्थापनासाठीच्या पैशांची निकड भागवितो.
  • पाणी

  • शंभर एकरांसाठी सहा विहिरी, सात बोअरवेल्स
  • संपूर्ण क्षेत्र १०० टक्के ठिबकखाली आणले.
  • जमीन सुपीकतेसाठी केलेले प्रयत्न

    अ) धरणातील गाळाचा वापर ब) हिरवळीच्या पिकांची लावण क) शेणखताचा वापर

    अ) दरवर्षी धरणातील गाळाचा वापर केला जातो. साधारण ४० ट्रक एवढी गरज भासते. प्रतिट्रक तीन हजार रुपये दर आहे. एवढा गाळ ८ ते १० एकरांना पुरतो. दरवर्षी वेगवेगळ्या जमिनीत त्याचा वापर होतो.

    ब) पहिला पाऊस पडल्यानंतर संत्रा बागेत बोरू, धैंच्याचे बियाणे वापरले जाते. साधारण ४५ दिवसानंतर हे पीक जमिनीत गाडले जाते. ट्रॅक्‍टरचलित यंत्राचा वापर त्यासाठी होतो. सुमारे ५० एकरांत दरवर्षी या खताचा वापर हे मडगे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

    क) जमिनीचा पोत राखण्यासाठी शेणखत देणे क्रमप्राप्त आहे. ललीत यांच्याकडे मर्यादीत जनावरे आहेत. त्यांच्यापासून शंभर एकरांवर शेणखताची गरज भागवणे व त्यासाठी ते विकत घेणेही परवडणारे नाही. मात्र इच्छा तेथे मार्ग या विचाराप्रमाणे ललीत यांना या समस्येचे समाधान गावातच सापडले. एका दुग्धोत्पादकाला त्यांनी आपली रस्त्यालगत असलेली जागा वापरण्यासाठी दिली. याच ठिकाणी संबंधित दुग्धोत्पादक आपली जनावरे बांधतो. त्यासाठी शेडही बांधले आहे. चारा साठविला जातो. या जागेच्या वापरापोटी भाडेशुल्क म्हणून जनावरांचे शेण हा दुग्धोत्पादक ललित यांना शेतीसाठी मोफत देतात. तसा दोघांमध्ये करार झाला आहे. इथे साधारण १५० म्हशी असून शेणखत वर्षाला ३०० ट्रॉलीपर्यंत उपलब्ध होते. संपर्क-ललित मडगे-९४०३०५४५१५, ७०२०२२०६६७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT