Weather Forecast Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील सात जिल्ह्यात पावसाची शक्यता; उद्यापासून पावसाचा 'येलो अलर्ट'

Weather Forecast : गुरुवारी राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

IMD Alert : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर आज म्हणजेच गुरुवारी राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात कोरड्या हवामाना अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापुर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तसेच रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धारशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT