Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: थंडी पुन्हा कमी होण्याचा अंदाज; राज्यातील अनेक भागात आज गारठ्याचे प्रमाण वाढले

Maharashtra Winter Weather: राज्यातील थंडी आज काहीशी वाढलेली दिसते. उत्तर भारतातही थंडीत चढ उतार कायम आहेत. राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील थंडी आज काहीशी वाढलेली दिसते. उत्तर भारतातही थंडीत चढ उतार कायम आहेत. राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला. मात्र आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीही काहीप्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतात थंडीचे प्रमाण कमी अधिक होताना दिसत आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत.

पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. आज मध्य प्रदेशच्या मंडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातील तापमानात चढ उतार राहून थंडीही कमी अधिक होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर राज्यातही थंडी स्थिर दिसत नाही. किमान तापमानात चढ उतार कायम आहेत. राज्यात तीन दिवस गारठा काहीसा वाढला होता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवड्यात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली आले आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

राज्यात अनेक भागात तापमानात चढउ उतार सुरुच आहेत. तर सकाळी धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीही काहीप्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT