Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात घट: थंडीचा कडाका वाढतोय

Maharashtra Temperature Drop : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. ६) राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास असल्याने थंडी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (ता. ७) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले. धुळे आणि निफाड येथेही पारा १० अंशांच्या खाली आला आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ८) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३०.९---१२.७
अहिल्यानगर---२९.२---१२.४
धुळे---२८.०---९.२
जळगाव---३०.०---८.८
जेऊर---३२.५---११.०
कोल्हापूर---३०.०---१६.४

महाबळेश्‍वर---२६.९---१४.०
मालेगाव---निरंक---१३.६
नाशिक---३०.४---१२.२
निफाड---२८.७---९.३
सांगली---३१.५---१३.९
सातारा---निरंक---१३.९
सोलापूर---३२.८---१६.४

महाबळेश्‍वर---२६.९---१४.०
मालेगाव---निरंक---१३.६
नाशिक---३०.४---१२.२
निफाड---२८.७---९.३
सांगली---३१.५---१३.९
सातारा---निरंक---१३.९
सोलापूर---३२.८---१६.४

सांताक्रूझ---३०.३---१५.२
डहाणू---२६.९---१५.२
रत्नागिरी---३१.०---१८.४
छत्रपती संभाजीनगर---३१.६---१५.०
धाराशिव---३०.७---१२.०
परभणी---३१.४---१३.५
परभणी (कृषी)---३०.५---१०.८
अकोला---३२.४---१४.४

अमरावती---३०.६---१५.३
भंडारा---२९.८---१४.६
बुलडाणा---२८.६---१५.०
ब्रह्मपुरी---३२.२---१३.६
चंद्रपूर---२९.८---निरंक
गडचिरोली---२९.०---१२.४
गोंदिया---२९.०---१२.४
नागपूर---३०.०---१३.७
वर्धा---३०.०---१५.०
वाशीम---३१.२---१७.२
यवतमाळ---३१.०---१४.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT