Monsoon Alert  Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon : उद्याही पावसाचा जोर कायम राहील का? राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी

Monsoon Alert : हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Team Agrowon

Maharashtra Rainfall Alert : राज्याच्या काही भागात आज जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर आज दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अंदाज दिला होता. रायगड, नागपूर, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टि दिला होता. तर सिंधुदुर्ग आणि आणि कोल्हापूर वगळता राज्यभरात ठिकठाकणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊसही झाला. पण बहुतांशी भागांमध्ये शेतकऱ्यांना अद्यापही पावसाचाी प्रतिक्षा आहे.

हवामान विभागाने उद्याही राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमवरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील,असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT