Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : पुढील २ आठवडे थंडी राहील का ? राज्यातील कोणत्या भागात गारठा जास्त राहू शकतो? 

Weather Update : राज्यातील अनेक भागात थंडी जाणवू शकते. तसेच किमान आणि कमाल तापमानात काहीसे चढ उतारही दिसू शकतात

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. तर काही भागात सकाळी धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात थंडी जाणवू शकते. तसेच किमान आणि कमाल तापमानात काहीसे चढ उतारही दिसू शकतात, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

राज्यात एक फेब्रुवारीपर्यंत मुंबईसह कोकणात सरासरीइतकी तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले. कोकणात पहाटेचे आणि दुपारचे किमान १४ अंश तर दुपारचे कमाल ३० अंसा दरम्यान राहू शकते.

खानदेश, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या १४ जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान ८ ते १० अंश म्हणजेच सध्याच्या तापमानापेक्षा १ किंवा २ अंशाने कमी राहू शकते.  

तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश म्हणजेच आतापेक्षा २ अशाने कमी राहू शकते. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान १२ ते १४ अंश तर दुपारचे कमाल तापमान ३० अंशाच्या दरम्यान राहू शकते, असाही अंदाज खुळे यांनी व्य्कत केला. 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की, नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी १४ अंशाच्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी जाणवेल.

नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड अशांने अधिक राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल.

काही भागात सध्याच्या धुके पडत आहे. याची कारणे सांगताना श्री. खुळे म्हणतात की. मध्य प्रदेशलगत खानदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात सध्या अधून-मधून सकाळच्या वेळी जाणवणारे काहीसे धुके काही दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

हे पडणारे धुके, जमिनीलगत दिड किलोमीटरपर्यंतचा शांत वारा, तसेच तेथील समुद्र सपाटीपासूनची कमी उंचीची भौगोलिक रचना, सध्याच्या वातावरणीय घडामोडी तसेच पहाटेच्या किमान तापमाना बरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचाही सरासरीपेक्षा घसरलेला पारा ह्यामुळेच धुके पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT