Rain Agrowon
हवामान

Paus Andaj : कोणत्या जिल्ह्यांना पाऊस दणका देणार ?  राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज

Weather Forecast : राज्यातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील. पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली. राज्यातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील. पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. उद्या सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रत्नागिरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

गुरुवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर रायगड, नगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

शुक्रवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यात पुढील ५ दिवस थंडी कमीच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT