राज्यात थंडी वाढली 
हवामान

Weather Update Maharashtra: राज्यात पुढील पाच दिवस थंडी वाढणार

Weather Report : पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Dhananjay Sanap

IMD Report : पहाटेच्या किमान तापमानात घट झाली आहे. तसेच धुकं जाणवू लागलं आहे. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि आणि विदर्भातही पारा खाली घसरला आहे. त्यामुळे थंडी वाढवण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली घसरला आहे.  मागील २४ तासात नालिया येथेत देशातील सर्वात कमी १३.५ अंश सेल्ससियस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासात प्रामुख्याने कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

पुणे, जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, निफाड, सांगली, सातारा, सोलापूर, सांताक्रूझ, डहाणू, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपूरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ भागात मागील २४ तासात किमान तापमानाचा खाली घसरले आहे. उर्वरित राज्यात वातावरणात गारवा पसरला आहे.

पुढील चार ते पाच दिवस  १ ते २ अंश सेल्सियसनं तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असून पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहील. तसेच पावसाची शक्यता नाही, असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT