Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : उन्हाचा चटका ठरतोय असह्य; राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज

Summer Heat : राज्यात आतापासूनच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी उन्हाचा चटका मात्र वाढला.

अनिल जाधव

Pune News : राज्यात आतापासूनच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी उन्हाचा चटका मात्र वाढला. आज सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी तापमान ३४ अंशाच्या पुढे होते. राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातील राज्यांमध्येही तापमानात चढ उतार सुरु आहेत. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. तर वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत ११० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.

याचा परिणाम थंडीवर दिसून येत आहे. आज राजस्थानमधील संगारिया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कर्नाटकतील कलबुर्गी येथे देशातील उचांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची ताप वाढली आहे. ऐन हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. दुपारी राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढलेला आहे.

आजही सोलापूर येथे सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमान ३४ अंंशाच्या पुढे गेले होते. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT