Storm Warning Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान; वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

Yellow Alert, IMD Update: राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येतो आहे. ६ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजा, सोसाट्याचा वारा आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात पावसाला पोषक वातावरण झालं आहे. आज (ता.६) राज्यातील ६ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर २४ जिल्ह्यात पावसाचा वादळी वारे आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्याच्या विविध भागात सोमवारी (ता.५) वादळी पावसाने धुमाकूळ घातला. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि गारपीटीनं शेती पिकांचं नुकसान झालं. तर वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

हवामानशास्त्र विभागाने आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ५० ते ६० किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे आणि विजांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात यवतमाळ जिल्हा वगळता सर्वदूर पावसाचा अंदाज आहे.

तसेच वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट हावामनशास्त्र विभागाने दिला आहे.

दक्षिण तेलंगणा आणि आसपासच्या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाचा चटकाही कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार आहे. राज्यात मागील चोवीस तासात विदर्भातील नरसिंगपुर येथे कमाल ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ४१.८ अंश, मराठवाड्यातील बीड येथे ४१.६ अंश, परभणी येथे ४१.४ अंश तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४१.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात पावसाला पोषक हवामान झालं आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस विविध जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT