Weather  Agrowon
हवामान

Rain Update : राज्यात पावसाला पोषक हवामान; तीन दिवस हवामान कसं राहणार? 

Weather Update : राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १७ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली. राज्यातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील. पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

उद्या रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर परवा म्हणजेच शुक्रवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, हिगोली, आणि नांदेड जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रायगड, नगर, नाशिक, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

शुक्रवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यात पुढील ५ दिवस थंडी कमीच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT