Pune News : ‘फेइंजल’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे राज्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. किमान तापमानाचा पारा वाढल्याने थंडी नाहीशी होत उकाडा वाढला आहे. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्रात सरकताना ही प्रणाली विरून जाण्याचे संकेत आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक आहे. बुधवारी (ता. ४) हरियानातील ‘हिस्सार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्याच्या किमान तापमान १५ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी नाहीशी झाली आहे. काही ठिकाणी उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. यातच बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.२ अंश तापमानाची नोंद झाली.
आज (ता. ५) राज्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.२ (२२.५), अहिल्यानगर २९ (२१.७), धुळे ३१ (१८), जळगाव ३१.२ (१४.८), जेऊर ३०.५ (१९.५), कोल्हापूर २७.५ (२२.६), महाबळेश्वर २३.४ (१७.७), मालेगाव २८.४ (२०.८), नाशिक २९.२ (२१.९), निफाड २६.५ (२२), सांगली २८ (२३), सातारा २८.७ (२२.७), सोलापूर ३० (२२.४), सांताक्रूझ ३४.४ (२५.५), डहाणू ३०.७ (२३.४),
रत्नागिरी ३५.२ (२६.६), छत्रपती संभाजीनगर २९.२ (२१.४), धाराशिव - (२१), परभणी २९.६ (२२.१), परभणी कृषी विद्यापीठ ३०.६ (२२), अकोला २९.८ (२३), अमरावती २९.८ (२०.९), भंडारा ३० (२१.०), बुलडाणा २८ (२०.८), ब्रह्मपुरी ३०.५ (१९.५), चंद्रपूर २९.४ (१६.४), गडचिरोली २९.२(१८), गोंदिया ३०.४ (२०.१), नागपूर २९.४ (२०.४), वर्धा २९ (२१.२), वाशीम २८.२ (२१.६), यवतमाळ २८.५ (-).
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.