Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: विदर्भात वादळी पावसाचा इशारा! हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

Rain Prediction: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असून, विदर्भात आज (ता. २०) वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तापमान ४० अंशांपार गेल्याने उष्णतेचा कडाका वाढला असून, मराठवाड्यातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यातील उष्णतेची लाट ओसरली असली तरी पारा चाळिशीपार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २०) विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर गुजरातपासून तमिळनाडूपर्यंत खंडित वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस तर सोलापूर, जेऊर, वाशीम, अकोला, गडचिरोली आणि वर्धा येथे तापमान ४० अंशांपार होते. मालेगाव, सांगली, सातारा, परभणी, अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्यात उन्हाच्या चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २०) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.७---१८.१

अहिल्यानगर---निरंक---१९.३

धुळे---३७.५---१४.६

जळगाव---३८.२---१५.९

जेऊर---४०.०---२०.०

कोल्हापूर---३६.८---२२.३

महाबळेश्‍वर---३३.०---१८.८

मालेगाव---३९.४---१८.८

नाशिक---३७.५---१८.२

निफाड---३७.३---११.५

सांगली---३९.०---२२.३

सातारा---३९.२---२०.४

सोलापूर---४०.४---२५.०

सांताक्रूझ---३२.८---२२.१

डहाणू---३४.९---२०.५

रत्नागिरी---३२.६---२०.७

छत्रपती संभाजीनगर---३७.७---२२.४

धाराशिव---निरंक---२१.८

परभणी---३९.३---२२.०

परभणी (कृषी)---३८.४---१९.७

अकोला---४०.१---२३.७

अमरावती---३९.६---२०.५

भंडारा---३८.०---२२.४

बुलडाणा---३८.०---२४.६

ब्रह्मपुरी---४१.५---२२.५

चंद्रपूर---४१.२---निरंक

गडचिरोली---४०.०---२१.०

गोंदिया---३७.०---२०.४

नागपूर---३९.०---२१.६

वर्धा---४०.०---२२.०

वाशीम---४०.२---निरंक

यवतमाळ---३९.६---२३.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.४---४१.५

मराठवाडा---१९.७---३९.३

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.१---४०.४

उत्तर महाराष्ट्र---११.५---३९.४

कोकण---२०.५---३४.९

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४१.२, सोलापूर ४०.४, वाशीम ४०.२, अकोला ४०.१, जेऊर ४०, गडचिरोली ४०, वर्धा ४०.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.

विजांसह पावसाची शक्यता :

नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT