Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave In Maharashtra: दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Summer Heat : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. यातच विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. यातच विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.

आज (ता. २) विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेला आहे.

तर जळगाव, सोलापूर, धुळे, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे पारा ४२ अंशांच्या पुढे होता. विदर्भ, मराठवाड्यात तापमान चाळिशीपार असून, मध्य महाराष्ट्र, कोकणातही उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.

उत्तर अंदमान समुद्रात, म्यानमारजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असून, आज (ता. २) विदर्भासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण व दमट त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.६ (२२.३), जळगाव ४२.७ (२८.०), धुळे ४२ (-), कोल्हापूर ३६.८ (२४.६), महाबळेश्‍वर ३१.७ (१७.६), नाशिक ३९.३ (२३.२),

निफाड ४१.१ (२४.४), सांगली ३७.५ (२५.०), सातारा ३९.७ (२३.१), सोलापूर ४२.५ (२७.४), सांताक्रूझ ३५.३ (२६.८), डहाणू ३४.७ (२७.१), रत्नागिरी ३४.१ (२७.६),

छत्रपती संभाजीनगर ४१ (२६.०), नांदेड ४१.६ (२८), परभणी ४२.७ (२७.५), अकोला ४३.७ (२८), अमरावती ४३.४ (२४.१), बुलडाणा ४०.३ (२७.८), ब्रह्मपुरी ४१.४ (२५.४),

चंद्रपूर ४१.८ (२६.२), गोंदिया ४१.४ (२४.२), नागपूर ४१.९ (२४.१), वर्धा ४३ (२६.५), वाशीम ४२ (-) यवतमाळ ४२ (२३).

अरबी समद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवार (ता. ७) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ४३.७, अमरावती ४३.४, वर्धा ४३, जळगाव ४२.७, परभणी ४२.७, सोलापूर ४२.५, धुळे ४२, वाशीम ४२, यवतमाळ ४२.

उष्ण लाटेचा इशारा

मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर.

विदर्भ : अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT