Heavy Rain Agrowon
हवामान

Heavy Rain Warning : अहिल्यानगर, नाशिक, धुळ्यात गारपिटीचा इशारा

Rain Alert : धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पाऊस सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा चटका पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २०) धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश तापमानाची नोंद झाली. कोकणातील डहाणू ३७.१ सेल्सिअस, अकोला येथे ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती, यवतमाळ, परभणी, गोंदिया, वर्धा येथे अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मॉन्सून परतला असला तरी राज्यात वादळी पावसाची हजेरी कायम आहे. आज (ता. २०) धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात विजांसह पावसाची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.८, अहिल्यानगर ३१, जळगाव ३४.६, कोल्हापूर २६.२, महाबळेश्वर २५.३, नाशिक ३१.९, निफाड ३३.१, सांगली २७, सातारा ३०.३, सोलापूर ३३, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३७.१, रत्नागिरी ३०.८, छत्रपती संभाजीनगर ३३, बीड ३२.३, धाराशिव ३१.९, परभणी ३५.२, अकोला ३६.७, अमरावती ३५.८, भंडारा ३३.०, बुलडाणा ३२.२, ब्रह्मपुरी ३७.२, चंद्रपूर ३४.२, गडचिरोली ३३.४, गोंदिया ३५.२, नागपूर ३४.६, वर्धा ३५, वाशीम ३४.८, यवतमाळ ३५.५.

कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यापासून जातेय दूर

पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांमुळे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात आहे. उत्तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, या परिसरावर सोमवारपर्यंत (ता. २१) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत (ता.२२) या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे.

वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : धुळे, नाशिक, नाशिकचा घाटमाथा, अहिल्यानगर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.

वाशीम : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.  

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ३७.२, डहाणू ३७.१, अकोला ३६.७, अमरावती ३५.८, यवतमाळ ३५.५, परभणी ३५.२, गोंदिया ३५.२, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT