Monsoon Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Early Monsoon Update: नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता असून, पुणे, अहिल्यानगरमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विविध ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर पोहोचल्याने उष्णतेची लाट कायम आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, आहिल्यानगर, सांगली, पुणे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली.

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर आणि ‎वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, तर ‎‎धुळे, सोलापूर, ‎‎भंडारा, ‎गोंदिया आणि ‎नागपूर येथे ३९ अंशांपेक्षा अधिक, तसेच ‎जेऊर, ‎गडचिरोली आणि ‎यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. संपूर्ण कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३३.६---२३.०

अहिल्यानगर---३५.२---२२.४

‎‎धुळे---३९.०---२२.५

‎जळगाव---३७.८---२५.८

‎जेऊर---३८.८---१९.०

‎कोल्हापूर---३४.८---२२.४

‎महाबळेश्वर---२६.६---१७.०

‎मालेगाव---३६.०---२३.०

‎नाशिक---३२.५---२१.९

‎निफाड---३४.०---२२.०

‎सांगली---३७.४---२१.३

‎सातारा---३४.०---२१.०

सोलापूर---३९.०---२२.२

‎सांताक्रूझ---३४.३---२६.३

डहाणू---३४.८---२६.०

‎रत्नागिरी---३४.६---२६.७

‎छत्रपती संभाजीनगर---३६.८---२२.५

‎धाराशिव---३६.८---२०.४

‎परभणी---३५.९---२५.४

परभणी (कृषी)---३४.७---२४.९

‎अकोला---३७.९---२५.८

अमरावती---३५.०---२५.९

‎‎भंडारा---३९.०---२५.०

बुलडाणा---३२.०---२४.८

‎ब्रह्मपुरी---४२.१---२५.५

‎चंद्रपूर---४१.२---२७.४

‎गडचिरोली---३८.६---२५.०

‎गोंदिया---३९.४---२५.४

‎नागपूर---३९.८---२५.४

‎वर्धा---४०.०---२६.९

‎वाशीम---३५.६---निरंक

‎यवतमाळ---३८.०---२६.४

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा. (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अहिल्यानगर, पुणे.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

‎४० अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ४२.१, चंद्रपूर ४१.२, ‎वर्धा ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT