Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची शक्यता; तापमानात झाली वाढ!

Maharashtra Weather Report : मागील चार ते पाच दिवस थंडीनं जोर धरला होता. परंतु गुलाबी थंडीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

Dhananjay Sanap

IMD Report : देशाच्या पूर्वकडील वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात पुढील तीन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील चार ते पाच दिवस थंडीनं जोर धरला होता. परंतु गुलाबी थंडीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात मात्र रविवारी तापमानात काहीशी वाढ पाहायला मिळाली. आज राज्यातील बहुतांश भागात प्रामुख्याने कोरड्या हवामानसह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज आहे. तर २३ नोव्हेंबरपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील २४ तासात नालिया येथे सर्वात कमी १३.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमान वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यात तापमानात काहीशी वाढ अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील तापमान पुढील तीन दिवस चढ-उतार होतील. तसेच गुरुवार पासून राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT