Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave Alert : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट ; ब्रह्मपुरी देशात सर्वात उष्ण

Summer Heat Update : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती.

अमोल कुटे

Pune News : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपुरी येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १५) विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा, तसेच राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर, अकोला, नागपूर आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, धुळे, मालेगाव, यवतमाळ आणि अमरावती येथे तापमान चाळिशीपार होते. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपार जात, तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश व त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाट आली होती.

दरम्यान, जळगाव, जेऊर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, गडचिरोली, गोंदिया आणि वाशीम येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका असह्य होऊ लागला असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्यात वाढ झाल्याने चांगलाच घामटा निघत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १२ ते २४ अंशांपर्यंत तफावत दिसून आली. आज (ता. १४) विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.७---१८.५

अहिल्यानगर---निरंक---१८.५

धुळे---४०.०---१४.०

जळगाव---३९.७---१९.८

जेऊर---३९.५---१९.५

कोल्हापूर---३८.०---२३.२

महाबळेश्‍वर---३२.९---२०.५

मालेगाव---४०.०---२१.६

नाशिक---३७.८---१८.७

निफाड---३८.५---१३.०

सांगली---३९.०---२३.५

सातारा---३८.५---२०.६

सोलापूर---४०.८---२४.२

सांताक्रूझ---३४.९---२४.१

डहाणू---३४.३---२१.६

रत्नागिरी---३३.५---२४.५

छत्रपती संभाजीनगर---३९.२---२२.५

धाराशिव---३८.२---२१.६

परभणी---३९.५---२३.१

परभणी (कृषी)---३९.४---१८.७

अकोला---४१.५---२२.५

अमरावती---४०.२---२१.५

भंडारा---निरंक---२०.०

बुलडाणा---३८.५---२३.०

ब्रह्मपुरी---४२.०---२०.२

चंद्रपूर---४१.८---निरंक

गडचिरोली---३९.६---१९.४

गोंदिया---३९.०---१९.४

नागपूर---४१.१---१९.५

वर्धा---४१.०---२२.०

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---४०.२---२२.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.४---४२.०

मराठवाडा---१८.७---३९.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.५---४०.८

उत्तर महाराष्ट्र---१३.०---४०.०

कोकण---२१.६---३४.९

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

४१ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४१.८, अकोला ४१.५, नागपूर ४१.१, वर्धा ४१.

उष्णतेची लाट असलेले ठिकाणे :

अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT