Maharashtra Weather Agrowon
हवामान

Vidarbha Heatwave: विदर्भ जळतंय! तापमान ४२ अंशांपार, उष्णतेचा कहर

Heatwave Alert: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढलाय. अनेक जिल्ह्यांत तापमान ४२ अंशांपार गेलं असून हवामान विभागाने उष्ण लाटेचा येलो अलर्ट दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पाऱ्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सूर्य तळपल्याने विदर्भात ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली असून, उष्ण झळांनी विदर्भाची होरपळ होत आहे. आज (ता. ८) कोकण, उत्तर महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराकडे येण्याची शक्यता आहे. या प्रणालीपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, नागपूर, यवतमाळ, धुळे येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, सोलापूर आणि वर्धा यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर जेऊर, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया येथे तापमान ४० अंशांवर होते.

तापमानात वाढ झाल्याने झळा असह्य होत असून, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. तापमानामुळे होरपळ वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. ८) संपूर्ण कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तसेच जळगाव, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.२---१८.५

अहिल्यानगर---निरंक---१८.५

धुळे---४२.०---१८.८

जळगाव---४२.५---२२.२

जेऊर---४०.५---१९.५

कोल्हापूर---३८.१---२३.४

महाबळेश्वर---३२.१---२०.०

मालेगाव---४०.८---२२.०

नाशिक---४०.२---१९.८

निफाड---३९.५---१६.८

सांगली---३८.३---२३.८

सातारा---३८.५---२१.०

सोलापूर---४१.४---२४.५

सांताक्रूझ---३३.८---२४.३

डहाणू---३६.१---२२.४

रत्नागिरी---३३.४---२५.५

छत्रपती संभाजीनगर---४०.२---२४.१

धाराशिव---३९.२---२२.२

परभणी---४०.७---२२.४

परभणी (कृषी)---४०.०---१७.४

अकोला---४३.२---२२.९

अमरावती---४२.६---२१.२

भंडारा---४०.२---२२.०

बुलडाणा---३९.०---२५.६

ब्रह्मपुरी---४२.९---२२.६

चंद्रपूर---४२.६---निरंक

गडचिरोली---४०.६---२१.६

गोंदिया---४०.४---२०.८

नागपूर---४२.२---२०.८

वर्धा---४१.१---२२.४

वाशीम---३७.८---निरंक

यवतमाळ---४२.२---२३.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.८---४३.२

मराठवाडा---१७.४---४०.७

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.५---४१.१

उत्तर महाराष्ट्र---१६.८---४२.०

कोकण---२२.४---३६.१

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, अकोला, यवतमाळ.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक.

४२ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३.२, ब्रह्मपुरी ४२.९, अमरावती ४२.६, चंद्रपूर ४२.६, जळगाव ४२.५, नागपूर ४२.२, यवतमाळ ४२.२, धुळे ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT