Summer Weather Agrowon
हवामान

Unseasonal Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज; विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला

Maharashtra Weather: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, तर विदर्भात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला आहे. हवामान विभागाने या बदलत्या वातावरणाची माहिती दिली आहे.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. अनेक भागात ढगाळ हवामान असल्याने उन्हाचा चटकाही कमी जाणवत आहे.

हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. यावेळी जोरदार वारे वाहतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातही सोमवारी आणि मंगळवारी तर पुणे जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवार असे ३ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

तसेच काही ठिकाणी यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मंगळवारी, तर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT