Weather Agrowon
हवामान

Unseasonal Rain: राज्यात ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज; बहुतांशी भागात ढगाळ हवामानाचा अंदाज

IMD Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात अवकाळीच्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर वाशीम, नागपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच वाशीम, नागपूर, गडचिरोली, अमरावती, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तसेच काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिला.

शनिवारी नांदेड, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर गोंदीया, वर्धा जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तसेच काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिला. रविवारी देखील राज्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT