Weather Agrowon
हवामान

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचे सावट कायम; राज्यातील काही भागात शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज

Thunderstorm Alert: महाराष्ट्रातील काही भागांत अद्याप अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. हवामान विभागाने सिंधुदूर्ग, नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. तर काही भागात तापमानात वाढ दिसून आली. हवामान विभागाने आज तसेच शनिवारी आणि रविवारी राज्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचाही अंदाज आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शनिवारी आणि रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर या जिल्ह्यातील इतर भागात ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यातील इतर भागात अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर तापमानात वाढ दिसून आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT