Rain Update Agrowon
हवामान

Orange Alert In Nanded : नांदेडला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात सहा एप्रिल रोजी येलो अलर्ट व सात एप्रिल या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Team Agrowon

Nanded Weather Update : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात सहा एप्रिल रोजी येलो अलर्ट (Yellow Alert) व सात एप्रिल या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सावधगिरी बाळगिण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सहा एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

या दिवशी दुपारपर्यंत नांदेडमध्ये ढगाळ वातावरण आहे. (ता. ७) एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.

या काळात नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळावे, जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये, उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये, जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT