Weather Agrowon
हवामान

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा अंदाज

Heavy Rains & Hailstorms Alert: राज्यभरात पुढील ४ दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे. हवामान विभागाने गारपीटीचा अंदाज दिला असून, काही जिल्ह्यात विजा, वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Maharashtra Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे. तर पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या १० जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे.

हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी वाज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. यावेळी अनेक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असाही इशारा देण्यात आला.

धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज, बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात आज तर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला.

पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी आज आणि उद्या गारपीटीचा इशारा देण्यात आला. यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच आज तसेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हमावान विभागाने दिला.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हमावान विभागाने दिला. तर सातारा जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे. तर यावेळी जोरदार वारे वाहतील, असाही इशारा हवामान विभागाने दिला. तर उद्या चंद्रपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे. तर यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हमावान विभागाने दिला. तसेच जोरदार वारेही वाहतील. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हमावान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT