Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Weather Forecast: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ५) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या तापमानात चढ -उतार सुरूच राहणार आहेत.

वेगाने महाराष्ट्रात धडकलेला मॉन्सून कमजोर होताच पावसाने उघडीप दिली. कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. बुधवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

आज (ता. ५) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

मॉन्सून काही हलेना

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने आगमन करणाऱ्या मॉन्सूनची चाल आठवडाभरापासून थांबली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्‍चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनचे पुढे चाल केली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून तर बंगालच्या उपसागरातून २९ मेपासून मॉन्सून पुढे सरकला नाही. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंतची मॉन्सूनची सीमा ‘जैसे थे’ आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस वाट पाहावी लागणार आहे.

बुधवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३२.२---२२.८

‎‎धुळे---३६.५---२०.८

जळगाव---३७.४---२३.८

‎‎कोल्हापूर---२९.५---२३.५

‎महाबळेश्‍वर---२१.८---१७.८

मालेगाव---३५.२---२३.८

‎‎नाशिक---३१.१---२२.६

‎निफाड---३३.०---२१.१

सांगली---३२.०---२३.१

‎सातारा---३१.३---२२.०

‎सोलापूर---३५.४---२४.४

‎सांताक्रूझ---३३.७---२४.२

डहाणू---३५.३---२३.७

‎रत्नागिरी---३२.२---२५.०

‎छत्रपती संभाजीनगर---३५.०---२४.२

धाराशिव---निरंक---२१.२

‎परभणी---३५.३---२४.१

‎‎अकोला---३७.७---२५.७

अमरावती---३६.०---२१.३

बुलडाणा---३३.६---२३.८

‎ब्रह्मपुरी---४०.०---२५.६

‎चंद्रपूर---३९.६---२६.८

‎गडचिरोली---३६.०---२६.४

‎गोंदिया---३७.४---२५.६

‎नागपूर---३८.८---२५.६

‎वर्धा---३७.२---२५.६

‎वाशीम---३५.४---निरंक

‎यवतमाळ---३७.०---२४.६

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

Well Repair Subsidy: अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना मिळणार विहीर दुरुस्तीचे अनुदान

Alphanso Mango Crisis: हापूस आंब्याचा हंगाम संकटात

Gas Theft Case: गॅस चोरीप्रकरणी १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त

SCROLL FOR NEXT