Rain Agrowon
हवामान

Unseasonal Rain Alert: राज्यात आजही वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अवकाळीसाठी पोषक हवामान

Heavy Rain Forecast: राज्यात वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यातील काही भागात मागील आठवडाभरात पाऊस आणि गारपीटीने नुकसान केले. हवामान विभागाने आज राज्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली. तर काही भागात पुढील ४ दिवस पावसाला पोषक हवामान असल्याचे म्हटले आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील भंडारा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

धाराशिव, सोलापूर, सांगली आणि लातूर जिल्ह्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर नांदेड जिल्ह्यात सोमवार आणि मंडळवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सिंधुदूर्ग जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

कोकणात उद्यापासून ४ दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. ऊन्हाचा चटकाही वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT