Weather Agrowon
हवामान

Maharashtra Unseasonal Rain: मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता!

IMD Rain Alert: मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवसात पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर नांदेड जिल्ह्यात ५ दिवस पावसाला पोषक हवामान आहे. रविवारी आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला. 

विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज तर भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. चंद्रूपर, गडचिरोली आणि गोंदीया जिह्यात आज, उद्या आणि सोमवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर यवमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी पावसाला पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटकाही चांगलाच वाढला आहे. आजही विदर्भातच उन्हाचा चटका अधिक होता. अकोला येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT