Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Warning : वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Alert : महिन्याच्या सुरुवातीला तीव्र थंडीने हुडहुडी वाढल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : महिन्याच्या सुरुवातीला तीव्र थंडीने हुडहुडी वाढल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २६) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा, तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. पश्‍चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. पश्‍चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. सोमवारी (ता. २३) पंजाबच्या ‘पतियाळा’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले असून, थंडी गायब होत उकाडा वाढला आहे. मंगळवारी (ता. २४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १३ अंश तापमान नोंदले गेले.

राज्यात किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेला आहे, राज्यात ढगाळ हवामान होत असून, पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. आज (ता. २५) राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. २६) शनिवारी (ता. २८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८ (१६.८), अहिल्यानगर २७.८ (१७.७), धुळे २७ (१३), जळगाव २८.२ (१७.३), जेऊर ३१.५ (१५), कोल्हापूर २८.१ (१८.६), महाबळेश्‍वर २०.६ (१४.६), मालेगाव २६.८ (१६.४), नाशिक २७.७ (१५), निफाड २३.५ (१३.८), सांगली २८.२ (१८.६), सातारा २७.२ (१६.८), सोलापूर ३०.८ (२२), सांताक्रूझ २८.७ (१९.५), डहाणू २६.४ (१८.६), रत्नागिरी ३०.२ (१९.८), छत्रपती संभाजीनगर २८.५ (१७),

धाराशिव (१५.२), परभणी २८.५ (१६.६), परभणी कृषी विद्यापीठ २८ (१५.६), अकोला २९ (१९.३), अमरावती २९.८ (१८.३), भंडारा २७.४ (१५), बुलडाणा २८.२ (१७.३), ब्रह्मपुरी ३२.८ (१५), चंद्रपूर २९.८, गडचिरोली २९ (१५.६), गोंदिया २८.६ (१५.३), नागपूर २८.८ (१५), वर्धा २८.१ (१६.५), वाशीम २७.६ (१८.६), यवतमाळ ३०.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT