Rain Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा इशारा

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या बहूतांश भागात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची चाल थबकली आहे. विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (ता. १६) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी पडत असल्या तरी उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ हवामान, उन्हाचा चटका, घामटा काढणारा उकाडा, दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी असे स्थिती राज्यात काही ठिकाणी अनुभवायला मिळत आहे.

पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेले असून, शनिवारी (ता. १५) विदर्भातील ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.५ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे पारा ४१ अंशांपार गेला आहे. खानदेश, पूर्व विदर्भात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. १६) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनची प्रगती नाही

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. बुधवारी (ता. १२) विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची चाल मंदावली असून, शनिवारी (ता. १५) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

मालवण, खालापूर, दापोली ७०, वाकवली ६०, श्रीवर्धन, भिवंडी, मुरूड प्रत्येकी ४०, रोहा, आवळेगाव हर्णे, अलिबाग, लांजा, चिपळूण प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

पिंपळगाव बसवंत, साक्री, गगनबावडा, बार्शी प्रत्येकी ४०, जामखेड ३०, नाशिक, महाबळेश्वर, चाळीसगाव प्रत्येकी २०.

मराठवाडा :

सेलू ७०, गंगाखेड, औसा प्रत्येकी ४०, फुलांब्री, सोनपेठ प्रत्येकी ३०, शिरूर अनंतपाळ, बदनापूर, उमरगा, घनसांगवी, केज, पाटोदा, धारूर, बीड, मंथा प्रत्येकी २०.

विदर्भ :

मातोळा, नांदगाव काझी प्रत्येकी ३०, यवतमाळ, मलकापूर, मुर्तजापूर, बुलढाणा, चिखली, सिंदेवाही, देसाईगंड वडसा, मारेगाव, चामोर्शी, राळेगाव, करंजालाड प्रत्येकी २०.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धारशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT