Rain Prediction Agrowon
हवामान

Rain Prediction : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानातही (Temperature) चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain Forecast) इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

राज्यावर वादळी पावसाचे सावट असले तरी कमाल तापमानात वाढ होत आहे. तापमान ३७ अंशांपार गेलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे तापमान ३९ अंशावर पोचले होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते.

आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. राज्यात कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.९ (१९.३), जळगाव ३९.० (२१.७), धुळे ३८ (१९.२), कोल्हापूर ३५.८ (२३.१), महाबळेश्वर २९.८ (१८.५), नाशिक ३६.७ (२१.३),

निफाड ३७.२(१६.७), सांगली ३६.६ (२१.७), सातारा ३४.८ (२०.५), सोलापूर ३८.९ (२२.०), सांताक्रूझ ३६.४ (२५.८), डहाणू ३४.५ (२४.१), रत्नागिरी ३६.४ (२३.६),

छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१९.८), नांदेड ३६.४ (२३.८), परभणी ३६.६ (२१.५), अकोला ३७.९ (२०.४), अमरावती ३६.४(२०.९), बुलडाणा ३३.५ (२१.०), ब्रह्मपुरी ३९.२ (२१.३),

चंद्रपूर ३९.२ (२५.४), गडचिरोली ३४.४(२०.६), गोंदिया २६.२ (२२.६), नागपूर ३६.४ (२२.९), वर्धा ३७.२(२१.९), वाशीम ३६.८ (१८.४), यवतमाळ ३६.५ (१९.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT